कविता 

कर्म

माणसाचे कर्म असे असावे
त्यात मानुसपण शोभुन
दिसावे

माणसाचे कर्म सोन्यासारखे
झळाळणारे असावे केवळ वरवर पॉलिश नसावे
कर्म असावे सकारात्मक जीवनाला दिशा,
आशाउत्साह देणारे

कर्मात दुर्गंधी नसावी
सुगंध दरवळणारा असावा
कर्माच्या गती वरच कर्माचे फळ मिळते
ते कुणाच्या बापाला नाही चुकते

कर्म हे स्वयंसिद्ध असते
त्याचे फळ स्वतःलाच मिळते
करा कर्म चांगले
स्वतःबरोबर समाजाचे भले

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts