कळंब

कळंब तालुका पञकार संघाचा 10 जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा

जिल्हा प्रतिनिधी-सलमान मुल्ला

कै.वसंतराव काणे आदर्श पञकार संघ पुरस्कार प्राप्त कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दि.10 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर असणार आहेत तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे – पाटील,मिरर नाउचे संपादक मंदार फणसे,राजकीय विश्लेषक अभय देशपांडे,अखील भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा श्रीधर भवर, भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात शाहु पाटुळे,संजय मिस्किन, भिमाशंकर वाघमारे,प्रमोद वेदपाठक,अशोक देशमाने,प्रशांत बर्दापूरकर,प्रा.सतीश मातने,सुभाष घोडके,राजकुमार कुंभार,बाळासाहेब काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच कळंब उपजिल्हा रुग्णालयाचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अस आवाहन कळंब तालुका पञकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यांचा होणार विशेष सन्मान
कळंब तालुका पत्रकार संघाचे संस्थापक कै स्वातंत्र्यसैनिक शिवशंकर घोंगडे यांच्या पत्नी श्रीमती दुर्गाबाई घोंगडे यांचा व कै सुधाकर सावळे यांचा कोरोनाने मृत्यू झाला असता त्यांच्या पत्नी अॅड शकुंतला फाटक – सावळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वतः व आपल्या दोन्ही मुलांना कोरोनामुकत होत सावरले यांचाही या कार्यक्रमात संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Related posts