उस्मानाबाद 

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना खासदार यांनी ‘बिहार रेजिमेंट शौर्य दाखवत असताना बाकी रेजिमेंट काय तंबाखू चोळत होत्या का ?’ असे भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द वापरले.सैनिकांन बद्दल अपशब्द वापरून गलिच्छ राजकारण करणाऱ्या अश्या प्रवृत्ती चा आम्ही देशभक्त म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला..

संजय राऊत आपण राजकारण जरूर करा परंतु भारतीय सैनिकांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केलात तर ते भारतीय नागरिक म्हणून आम्ही कदापिही सहन करणार नाहीत. याचाच निषेध म्हणून आज उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने संजय राऊत याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Related posts