महाराष्ट्र

या औषधांचा वापर बंद करण्‍याचा आदेशही दिला आहे

नवी दिल्‍ली; कोरोना रुग्‍णांना देण्‍यात येणार्‍या औषधांबाबत केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. आयव्‍हरमेक्‍टीन, हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्‍वीन आणि डॉक्‍सिसाइक्‍लिन या औषधांचा वापर बंद करण्‍याचा आदेशही दिला आहे.
आयव्‍हरमेक्‍टीन या औषधाच्‍या वापरास जागतिक आरोग्‍य संघटनेने विरोध केला होता. तसेच हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्‍वीनच्‍या वापरासह बंदी होती. मात्र देशातील वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे मागील वर्षी भारताचे औषध महानियंत्रकाने (डीसीजीआय) एक वर्षांपूर्वी आयव्‍हरमेक्‍टीन, हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्‍वीन आणि डॉक्‍सिसाइक्‍लिन औषधांच्‍या वापरास मंजुरी दिली होती. मात्र आपत्तकालीन परिस्‍थिती असेल तरच या औषधांचा वापर केला जाईल. यासाठी रुग्‍णांच्‍या नातेवाईकांची परवानगी घेणे अनिवार्य असेल, असे स्‍पष्‍ट केले होते. तसेच हे औषध १४ दिवस दिले जावे. एक हजार रुग्‍णांवर या औषधाचे कोणते परिणाम होतात हे तपासले जावे. असेही ‘डीसीजीआय’ स्‍पष्‍ट केले होते.
केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाच्‍या नवीन नियमावलीत म्‍हटलं आहे की, ज्‍यांना कोरोनाची लक्षण दिसत नसतील किंवा सौम्‍य लक्षण असेल तर संबंधित रुग्‍णांना कोणतेही औषध घेण्‍याची गरज नाही. तसेच अन्‍य रोगांवरील सुरु असणारी औषध सुरु ठेवावीत. अशा रुग्‍णांनी व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा. तसेच संतुलितआहार घ्‍यावा, मास्‍कचा वापर आणि सोशल डिस्‍टसिंग आदी नियमांचे पालन करावे. आता कोरोना रुग्‍णांना आयव्‍हरमेक्‍टीन, हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्‍वीन आणि फेवीपिरवीर ही औषधही देण्‍यात येवू नयेत. तसेच कोरोनाबाधितांनी तात्‍काळ दुसरी चाचणी करण्‍याचीही आवश्‍यकता नाही, असेही नियमावलीत म्‍हटले आहे. कोरोना काळात रुग्‍णांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यातून आपल्‍या नातेवाईकांच्‍या संपर्कात रहावे. याचा सकारात्‍मक मानसिकतेचा परिणाम प्रकृतीवर होता, असे आरोग्‍य मंत्रालयाने २७ मे रोजी म्‍हटले हाेते.

Related posts