भारत महाराष्ट्र

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची वेळ आलीय का?

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी मिनी लॉकडाऊन तर काही राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा होऊ लागली आहे. यावर तज्ज्ञांचे मत काय आहे? याबाबत ‘आजतक’ने वृत्त दिले आहे, ते जाणून घेऊया… (Time for a national lockdown to bend Covid curve? Here’s what experts have to say)PHFI बंगळुरूचे प्राध्यापक गिरीधर बाबू यांचे म्हणणे आहे की, देशव्यापी लॉकडाऊन हा पर्याय आहे, असे वाटत नाही. कारण, आपण या व्हायरसचे संक्रमण होण्याच्या पद्धतीला समजू शकत नाही. एपिसेंटर्स काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. जसे की कर्नाटकात बंगळुरू आहे, म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करणे योग्य होणार नाही.
याचबरोबर, कंटेन्मेंट झोनही आपण यशस्वी करू शकलो नाही. लॉकडाऊन शहर आणि जिल्हास्तरावर ठिक आहे. कोरोना रुग्णांचे आकडे कसे कमी होतील, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. लॉकडाऊनमुळे केवळ कोरोना रुग्णांच्या संख्येला आवर घालता येईल. पण कंटेन्मेंटमुळे खूप मदत होईल, असे प्राध्यापक गिरीधर बाबू यांनी सांगितले.
(‘केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील’, सोनिया गांधींची टीका )
‘लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो’
लॉकडाऊन आपल्याला तयारीसाठी वेळ देतो, मात्र लॉकडाऊनसाठी सुद्धा तयारीची आवश्यकता आहे.आता ऑक्सिजनची दुप्पट मागणी वाढली आहे. कर्नाटकमध्ये लॉकडाऊनचा एक मोठा संकेत सुद्धा आहे. लॉकडाऊनच्या काळात लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे रणनीतीमध्ये बदल आवश्यक आहे, असे कर्नाटक कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. विशाल राव यांचे मत आहे.

Related posts