महाराष्ट्र

आयपीएल २६ मार्चपासून,पहा वेळापत्रक

मुंबई:आयपीएल  2022 चं बिगुल वाजलंय. गुरुवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आयपीएलला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. करोनाचं संकट असलं तरी, ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या तारखेची घोषणा झाली असली तरी, पूर्ण वेळापत्रकासाठी चाहत्यांना अद्याप वाट पाहावी लागणार आहे. आयपीएल स्पर्धा कधीपासून सुरू होईल, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. आयपीएल स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचे आयोजन मुंबई आणि पुण्यात होईल. चार मैदानांवरच सर्व सामने खेळवले जाणार आहेत. त्यातील मुंबईत तब्बल ५५ सामने खेळवले जाणार आहेत. तर १५ सामने हे पुण्यात खेळवले जातील.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये २० सामने, नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये २०, सीसीआयच्या मैदानात १४ सामने खेळवले जातील. तर पुण्यात १५ सामने होतील. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अद्याप अजून एक बैठक होणार आहे, असे सूत्रांकडून कळते. दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन फ्रेंचाइजी पहिल्यांदाच आयपीएलचा भाग होणार आहेत. मात्र, दोन्ही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळण्यास मिळणार नाहीत.

हे दहा संघ आयपीएल खेळणार
दिल्ली कॅपिटल्स
चेन्नई सुपर किंग्ज
मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
कोलकाता नाइट रायडर्स
पंजाब किंग्ज
गुजरात टायटन्स
लखनऊ सुपर जायंट्स
सनरायझर्स हैदराबाद
राजस्थान रॉयल्स

आयपीएल सामने ज्या चार मैदानांवर होणार आहेत, तिथे प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याचे कळते. महाराष्ट्र सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे पालन करून हे सामने खेळवले जातील, असे सांगितले जाते. मैदानात २० ते २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल, असे मानले जात आहे. या स्पर्धेच्या आधी फेब्रुवारीमध्ये आयपीएलसाठी मेगा लिलाव पार पडला होता. यावेळी मेगा लिलावात २०० हून अधिक खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. मुंबई इंडियन्सने इशान किशनला सर्वाधिक १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. इशान हा या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

Related posts