महाराष्ट्र

खंडीत वीज पुरवठा त्वरीत सुरु करुन वीज बील भरणेस मुदतवाढ देण्यात यावी. – चेअरमन, कल्याणराव काळे

सचिन झाडे –
पंढरपूर प्रतिनिधी दि.26 पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडीत केलेला आहे. कोणतीही पुर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांची पिके जळु लागलेली असून खंडीत केलेला वीज पुरवठा पुर्वरत करुन शेतकऱ्यांना वीज बील भरणेसाठी मुदत वाढ मिळावी असे निवदेन पंढरपूर विभाग महवितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांना सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिले.

यावेळी विठठल सह.सा.कारखान्याचे
मि.संचालक महादेव देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे संचालक हणमंत मोरे, विठठलचे माजी संचालक विलास भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश देठे उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडीत केलेला आहे. कोणतीही पुर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांची पिके जळु लागलेली आहेत तसेच रब्बी हंगामाचा पेरणी कालावधी असल्याने तो लांबणीवर पडत आहे त्यामुळे भविष्यकाळात शेतकऱ्यांना मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पुर्णपणे विद्युत पुरवठा खंडीत केल्याने वाडी-वस्तीवरील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे.

यावेळी कल्याणराव काळे म्हणाले सध्या शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत असल्यामुळे वीज बीलाची मोठी रक्कम भरु शकत नाही. त्यांना टप्या-टप्यांनी वीज बील भरण्यास सवलत देवून सहकार्य होणे गरजेचे आहे, तरी सध्या कोणतीही पुर्व सुचना न देता खंडीत केलेला वीज पुरवठा पुर्वरत करुन शेतकऱ्यांना वीज बील भरणेसाठी मुदत वाढ देण्यात यावी असे काळे यांनी सांगीतले.

Related posts