उस्मानाबाद  तुळजापूर

प्रेयसी साठी आकाशातले तारे आणण्यापेक्षा आई वडिलांसाठी खांद्यावरचे तारे घेऊन या – शिवश्री ऋषिकेश शिवाजी घोडके.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

किलज – तुळजापूर तालुक्यातील किलज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किलज येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान मालेचे आयोजन दि.२० रोजी करण्यात आले होते. यामध्ये व्याख्याते म्हणून लाभलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री. ऋषिकेश घोडके हे होते. शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या छोटे खाणी स्वरूपाच्या कार्यक्रमात सर्व नियमांचे पालन करीत योग्य ती खबरदारी घेत हा कार्यक्रम पार पडला.

यामध्ये घोडके यांनी शिवाजी महाराजांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तरुण वर्ग पुढे आला पाहिजे, महाराजांचे महिला बाबतीत असणारे धोरण आणि आताची परिस्थिती याचा आपण विचार करायला पाहिजे असे शिवश्री.घोडके यांनी बोलताना सांगितले. यामध्ये लहान मुलेही उपस्थित होती त्यांना ही मनोरंजनाच्या माध्यमातून करिअर संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील तरुण वर्ग तसेच गावातील महिला ही बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Related posts