उस्मानाबाद 

विवेकानंद युवा मंडळातर्फे छत्रपती संभाजीराजेंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

प्रतिनिधी – प्रतिक शेषेराव भोसले
उस्मानाबाद (धाराशिव)

१६ जानेवारी या पावन दिनी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. छत्रपती संभाजीराजे युवकांचे खूप मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या मते पुत्र कसा असावा याचे अत्यंत प्रगल्भ उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीराजे होत.

“पुत्र असावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” असे संत तुकाराम महाराज म्हणत, छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास विवेकानंद युवा मंडळ सतत वेगवेगळ्या माध्यमांद्वारे मांडण्याचा प्रयत्न करीत असते. या शंभुराज्याभिषेक दिनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या शंभू गीताचे पठण करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील साईराम नगर मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळामार्फत करण्यात आली, व उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांना शंभूराजांच्या व्यक्तिमत्व सारखे स्वच्छ, निखळ व व्यसनमुक्त चरित्र घडविण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, राज्य समन्वयक स्वप्नील देशमुख, आबा सुरवसे, सलमान सय्यद, क्रांतिसिंह काकडे, शुभम मगर, कृष्णा एडके, आशिष मासाळ, रोहित भोंग, बळीराम माळी, आदित्य खूणे, साई सुरवसे, शंतनु काळे, सौरभ शिंदे, उदय गायकवाड, ओमकार येडके, नेहरू युवा केंद्राचे प्रशांत मते, रोहन गाढवे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts