उस्मानाबाद 

मांजरा धरण १००% भरल्याने जलाशयाची पाहणी व विधिवत पूजन.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

काल दि. २६ ऑक्टोबर रोजी, मांजरा_धरण या वर्षी शंभर टक्के भरल्याने प्रकल्पातील जलाशयाची पाहणी व विधिवत पूजा करून #जलपूजन धारशिवचे लोकप्रिय खा. मा. ओमराजे निंबाळकर व आ.कैलास घाडगे-पाटील तसेच कळंब शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे आदींच्या हस्ते करण्यात आले.

या धरणातून लातूर जिल्ह्यास उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील काही गावांनाची धरणातून तहान भागवली जाते. पाणी वाया जावू नये यासाठी आवश्यक बाबी तात्काळ करण्यात याव्यात. तसेच सर्वांनी पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी केले.

यावेळी धारशिवचे खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास घाडगे-पाटील, तालुकाप्रमुख शिवाजी अप्पा कापसे, चत्रभुज काका टेळे, सुधाकर टेळे, नानासाहेब टेळे, परमेश्वर टेळे, पत्रकार राजेश मुंदडा, रत्नण माळकर, कोथळाचे सरपंच दिपक जाधव, हिंगणगावचे उपसरपंच प्रकाश अभंग, डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, माजी सरपंच शेषराव टेळे, मधुकर टेळे, शरद टेळे, अनंत जाधव, विष्णू इरकर,दादा टेळे, मांजरा धरणाचे शाखा अभियंता श्री.पाटील, बाळासाहेब काळे,अमर टेळे, महादेव मस्के, उत्तम थोरात, नागेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts