Blog

उद्योगी चिमण्या – देविदास पांचाळ (सर)

उद्योगी चिमण्या – देविदास पांचाळ (सर)

प्रातः काळा पासून चिव चिव चिव करत आपणा सर्वांना जागवणाऱ्या त्या चिमण्या किती उद्योगी असतात हे आपण कधी पाहिलेच नसते मित्रांनो चिमणी केवढी तिचं पोट केवढं आणि तिचे कष्ट केवढी याचा खरंच जवळून अनुभव घेतला तर आश्चर्यच…

आमच्या शेजारी घरात विश्व खबोले नावाचा एक लहान मुलगा राहतो एकदा त्याच्यासमोर घरातील माळ्यावरून एक नुकतेच जन्मलेले चिमणीचे लहान पिल्लू पडले त्याने ते उचलले जवळजवळ एक महिना त्या पिलाचे संगोपन केले त्याला एक एक कण तो खाऊ घालायचा एक एक पाण्याचा थेंब पाणी पाज वायचा अशा पद्धतीने त्या पिलाला मोठे केले व जीवदान दिले ते पिल्लू त्याच मुलाजवळ त्याच्या अंगाखांद्यावर राहू लागले व खेळू लागले अतिशय प्रेरणादायी प्रसंग आहे हा एवढ्या लहान चिमण्या काम करतात तरी काय तर त्या दिवसभर इकडून तिकडून काड्या कस्पटे गवत दोरा जमा करतात व आपले घरटे खोपा तयार करण्याचे काम सुरू करतात एक एक काडीजमा करून त्या आपल्या चोचीने विणतात इतके सुंदर इतके अप्रतिम इतके मुलायम इतके सुरक्षित इतके जाळीदार इतके नक्षीदार व गुप्त पद्धतीने बनवतात की बघणारा बघतच राहतो ज्या चिमण्यांचे हात म्हणजेच चोच त्याच चोचीने आपले अद्भूत कार्य करतात माणसाला उद्योगाची कष्ट करण्याची प्रेरणा देणाऱ्या या छोट्या चिमण्या आपण एकदा घर बांधलं की संपलं आपले जीवन पण चिमण्या चे तसे नाही एक झाले की एक घरटे तयार करण्याच्या मार्गावरच कधी झाडावर कधी विहिरीच्या मध्यभागी कधी घरातील छतावर माळ्यावर खिडकी दरवाजे गॅलरी एक ही जागा अशी शिल्लक सोडत नाही.

त्यात काही चिमण्या या सुगरण चिमण्या म्हणून ओळखल्या जातात तर काही कुंभारा प्रमाणे काम करणाऱ्या चिमण्या दिसून येतात त्या मातीचा चिखलाचा एक एक कण गोळा करून आपले घरटे बनवतात घरट्याला छोट्या आकाराचे लंबुल केदार व आत लांब पर्यंत गेल्यावर गोल आकाराची जागा ज्या ठिकाणी त्या पिला सहित सुरक्षित राहू शकतील असे बनवतात एखादा मूर्तिकार जीव ओतून मूर्ती बनवावा एखादा कुंभार विविध प्रकारचे विविध आकाराचे नक्षीदार सुंदर रेखीव आखीव घोटी घोटीव एखाद्या इंजिनियर ला सुद्धा लाजवेल असा आपण जे श्रम सापडले म्हणतो ते खरं तर चिमण्या मध्ये दिसून येते एक प्रकारची जिद्द चिकाटी कामावर असलेलं प्रेम ध्येय विश्वास त्यांच्याकडून शिकायला मिळतो कितीही मोठे वादळ वारे महापूर येऊद्या घरटे वाहून गेले किल्ले वाहून गेले तरी ते दुःख करीत किंवा मागील आठवणी करत बसत नाही तर सगळं काही विसरून पुन्हा जोमाने कामाला लागतात ईश्वराने आपल्याला दोन अनमोल गोष्टी दिल्या आहेत त्या म्हणजे स्मरण आणि विस्मरण दुःख सगळे विस्मरण करायचे वाईट घटना संकटे सगळे डिलीट करायचे व भविष्यातील आनंदाचा वेध घ्यायचा.

प्रसिद्ध हिंदी कवी डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांची एक सुंदर कविता आठवते पुन्हा नया निर्माण करो चिमण्यांचे आणखी एक विशेषता म्हणजे या एकोप्याने राहतात आपल्या लहानपणी आपण चिमण्यांची तारा वरील शाळा पहिली आहे पण आज आधुनिक तंत्रज्ञान वाढल्याने त्याचा परिणाम या छोट्या-छोट्या जीवावर होत आहे व चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसून येते गेल्या वीस वर्षापासून मी चिमण्यांना विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत आहे माझ्या छोट्या घराच्या छोट्या गॅलरी आजही थवेच्या थवे येताना आपल्याला दिसतील हा एक छोटासा प्रयत्न आहे सर्वांनी जमेल तसे जमेल त्या पद्धतीने पक्षावर दया व पक्षांना सहायता केली तर यापेक्षा ते पुण्य कोणते पक्षी प्रेमाचं आधुनिक काळातील उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लातूर येथील पक्षीप्रेमी हमीदचाचा त्यांच्या घरी सर्व प्रकारचे पक्षी आनंदाने राहात असलेले आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतील व्हिडिओच्या माध्यमातून पक्षी प्रेम खरोखरच कसा असतं याचा आपल्याला अनुभव येईल या इवल्याशा चिमण्यांचे कष्ट पाहता कष्टाचे मोल अनमोल असेच आपल्याला म्हणता येईल।

लेखक

देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर

Related posts