अक्कलकोट

शिव-बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्तवतीने पाणपोईचे उद्घाटन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – शिव-बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या कार्यालयासमोर भव्य पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले, संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा उल्लेखनीय उपक्रम राबविला आहे ,

सध्या महाराष्ट्र शासनाने लावलेल्या कडक निर्बंधामुळे शहरातील सर्व हॉटेल,कॅन्टीन बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसून त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ,त्याच अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना व तसेच इतर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागु नये व त्यांना पाण्याची सोय व्हावी ह्या उद्देशाने शिव-बसव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाणपोई चे उद्घाटन वकील अॅड अनिल मंगरूळे यांच्या हस्ते करण्यात आले व तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन डॉ काशीनाथ तुकमळी, पत्रकार शिवानंद फुलारी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश बिराजदार, पत्रकार स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच जयंतीचे औचित्य साधुन हलाकीच्या परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र शासनामार्फत घेतली जाणारी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले रमेश धोत्रे यांचा ही सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला,पाणपोई च्या उद्धाटन प्रसंगी अॅड अनिल मंगरुळे यांनी मनोगत व्यक्त केले,त्यांनी जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले,तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या, संस्थेचे कार्य उल्लेखनीय असुन शिव-बसव डॉ बी आर आंबेडकर ही संस्था नेहमी समाजपयोगी कार्य करत असते व समाजातील गोरगरीब जनतेला नेहमी मदत करण्यास तत्पर असते हे कार्य अतिशय उल्लेखनीय असुन आगामी काळात विविविध समाजपयोगी उपक्रम संस्थेच्या माध्यमातून घेतले जावेत असे प्रतिपादन त्यांनी केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मडिखांबे,भीम प्रकाश मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिलामणी दादा बनसोडे, सिद्धू घटकांबळे ,दशरथ मडिखांबे, महादेव बनसोडे,महेश घटकांबळे,महेश नडगम, उत्तम बनसोडे,शार्दुल रसनभैरे, स्वामी गायकवाड,दशरथ नडगम, बंटी नडगम ,गंगाराम वाघमारे,राजरत्न थंब, आदित्य गायगवळी,श्रीशैल कारागीर,संतोष इंगळे,समर्थ सुतार ,कृष्णा राजापुरे,विठ्ठल होटकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.खंडू खंडाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मरेप्पा शिवशरण यांनी केले.

Related posts