करमाळा

कंदरमध्ये कोविड सेंटरचे उद्घाटन

ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी लोकवर्गणीतून तयार केलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन आज समीर माने साहेब तहसीलदार करमाळा, मा. श्रीकांत खरात गटविकास अधिकारी करमाळा, मा. सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक, करमाळा, मा. डॉ सागर गायकवाड साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी करमाळा, सरपंच भास्करराव भांगे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे, माजी संचालक नवनाथ शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक रंगनाथ शिंदे, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी, पत्रकार गणेश जगताप, पत्रकार सुहास साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मित्र, सर्व देणगीदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सर्वच अधिकारी यांनी कंदरकर यांनी चांगला निर्णय घेऊन कोविड सेंटर सुरू केल्याचे कौतुक केले. यासाठी जे काही मदत लागेल तीही आम्ही देऊ असेही अधिकारी म्हणाले.

Related posts