दक्षिण सोलापूर

बरूर येथे उमेद अभियानंतर्गत ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे उमेद अभियानंतर्गत ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार व व्दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेद अभियानाचे व्यवस्थापक श्री. प्रदीप बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशोधरा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता कोलूर,उमेद अभियानाचे अधिकारी यशपाल गायकवाड व दिगंबर साळुंखे तसेच बरूर गावाचे सरपंच सौ शोभाताई टेळे, सौ प्रेमा हवीनाळे,अलिम शेख, राजश्री येणगुरे,पंचशीला कसबे व बरूर उपसरपंच मल्लिकार्जुन नंद्राळे व ग्रामपंचायत सदस्य तम्माराया मकणापुरे , सौ सुनिता ख्याडे, अखिल कुडले, उमेद अभियानात सीआरपी म्हणून काम करणारे सौ रेणुका रगटे, रेणुका भासगी, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री. एम आर परीट, प्रदीप टेळे,अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव श्री श्रीमंत डोमनाळे, शांतकुमार शिंदे ,ग्रामपंचायत कर्मचारी सद्दाम मकानदार, झाकीर मुल्ला,हासिना मकानदार, श्री शक्ति ग्रामसंघाचे अध्यक्ष यलूबाई कंदगल, सचिव निर्मला कनशेट्टी, कोशाध्यक्ष सावित्री मुळगे, लिपिक काजल पठाण व जीवनज्योती ग्रामसंघाचे अध्यक्ष धानेश्वरी ख्याडे, सचिव पुजा स्वामी, लिपिक कोमल स्वामी, कविता चौगुले,बँक सखी आफ्रिन पटेल व पुजा माळी,प्राथमिक शाळेचे शिक्षक कोळी सर आणि बचत गटातील सर्व सदस्य महिला व आशा वर्कर स्वाती वाघमोडे,महानंदा म्हेत्रे,आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसंघाचे उद्देश महिलांना स्वावलंबी व सवंयरोजगार उपलब्घ करून देण्याचा आहे दिगंबर साळुंखे याने आपले मनोगतात व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रस्तावना स्वाती वाघमोडे याने केले सर्व महिला बचत गट सदस्यांना स्वयरोजगार उपलब्ध करून देण्यात ग्रामसंघ सदैव प्रयत्नशील राहील असे व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहिलेले यशोदरा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता कोलूर याने आपले मनोगतात महिलांचे आरोग्यविषयी रक्तदाब व विम्यासंबधित माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री कोळी सर याने केले.तसेच आभार प्रदर्शन हसीना मकानदार याने केले.

Related posts