पंढरपूर

गोपाळपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकीत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे उदघाटन.

स्वेरीच्या मार्गदर्शन कक्षातून मिळतेय अचूक माहिती

पंढरपूरः-
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष (पदवी) व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्वेरीमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रजिस्ट्रेशन व पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये व अभियांत्रिकी प्रवेशाबाबत विद्यार्थी व पालकांना योग्य माहीती देण्याच्या व मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापासून ते कागदपत्रे पडताळणी, अपलोडींग, कॅप राउंडस् आदी सबंधित प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. परंतु विद्यार्थी व पालक यांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी स्वेरीमध्ये या मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन पंढरपुरातील पालक-पत्रकार भगवान वानखेडे यांच्या हस्ते व सौ.अंजली वानखेडे, प्रेरणा वानखेडे तसेच इतर पालक, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे व प्रवेश प्रक्रियेतील प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत झाले. या मार्गदर्शन केंद्राचा लाभ बारावी सायन्स, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा. अभियांत्रिकी पदवीच्या प्रवेश प्रक्रियेत वरचेवर बदल होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पदवी अभियांत्रिकीच्या संबंधी अधिक माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.mahacet.org या वेबसाइटला भेट द्यावी किंवा पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी ( ९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८) प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) व प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

स्वेरीमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रिया केंद्राच्या सोयीमुळे विद्यार्थ्यांना आता खात्रीशीर मार्गदर्शन मिळत आहे. विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, उत्कृष्ट प्लेसमेंट, उत्कृष्ट संशोधन, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि उत्कृष्ट मानांकने या महत्वाच्या बाबींमुळे यावर्षीही विद्यार्थी व पालकांमध्ये श्री विठ्ठल अभियांत्रिकीला प्रथम पसंती असल्याचे दिसून येत आहे.

Related posts