महाराष्ट्र

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या मुलींना मारली बाजी.

पुरुषोत्तम विष्णु बेले
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी

लोहारा- खेलो इंडिया अंतर्गत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन क्रिडा कार्यालय,उस्मानाबाद व जिल्हा कबड्डी असोसिएशन उस्मानाबाद यांच्या वतीने दि : 23 नोव्हेंबर 21 रोजी उस्मानाबाद येथे घेण्यात आल्या.
या मॅटवरील कबड्डी स्पर्धेत भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, लोहारा येथील मुलींनच्या कबड्डी संघानी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सर्व प्रतिस्पर्धी मुलींनच्या संघाचा पराभव करून फायनल मॅच जिंकून विभागीय स्पर्धेसाठी भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या मुलींनची कबड्डी साठी निवड झाली आहे.
विभागीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत निवड झाल्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने लोकल मॅनेजमेंटचे अध्यक्ष प्रा.सतिश इंगळे यांच्या हस्ते सर्व विजेत्या कबड्डी स्पर्धेकांचे सत्कार करण्यात आला. कु.साक्षी दिपक गिल्डा (12विज्ञान), कु. निकिता नारायण जावळे ( 11विज्ञान), कु.दिक्षा दयानंद कदम ( 11विज्ञान), कु. श्रृष्टी सुरेश क्षीरसागर ( 12कला), कु.प्रतिज्ञा बाबासाहेब भालकडे ( 11 वाणिज्य), कु. श्रध्दा भैरू वडजे (11कला) कु.प्रांजली मनोहर क्षीरसागर, कु.अपेक्षा नारायण जावळे .यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. यशवंत चंदनशिवे ( उपप्राचार्य) , श्री.महादेव कदम ( कबड्डी कोच ), श्री. दयानंद कदम ( पालक) , प्रा.अभिजीत सपाटे, प्रा.मल्लीनाथ चव्हाण, प्रा.सौ.स्वाती माने, प्रा.सौ. प्रीती इंगळे, प्रा.स्नेहलता करदुरे, प्रा. आरती पाटील.सर्व शिक्षेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनीही अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.

Related posts