उस्मानाबाद 

पर्यावरणाचे संतुलन टिकवायचे असेल तर 20 टक्के असलेली वनक्षेत्र 30 टक्केपर्यंत नेण्याची गरज – प्रा. सिद्धेश्वर मते

पुरुषोत्तम विष्णु बेले
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद कार्यालयामार्फत आज दि.30/11/2021 रोजी दिशा करिअर अकॅडमी येथे नेहरू युवा केंद्रा मार्फत युवा प्रशिक्षण “स्वच्छ गाव हरित गाव “या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री उंबरे बाळकृष्ण सर ,श्री अजित रणदिवे सर , श्नी नागेश घेवारे सर,श्री बालाजी आवटे सर या उपस्थित होते.  सिद्धेश्वर मते सर स्वच्छ गाव या विषयावर मुलांना सखोल असे मार्गदर्शन केले सर बोलले की , पर्यावरण संतुलित ठेवायची असेल तर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे 20 टक्के असलेले वनक्षेत्र 30 टक्के पर्यंत नेण्याची गरज आहे हे काम प्रत्येक व्यक्ती करू शकतो यासाठी युवा पिढी ने पुढे येऊन काम करत राहावे तसेच गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा करण्यात यावा व त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी जिथे पडीक मोकळी जागा असेल तिथे वृक्ष लागवड करावी जेणेकरून आपल्या पुढील पिढीला त्याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मुले व मुली यांना फाईल,काँनर्फन्स पँड व पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांचे आभार श्री. नागेश घेवारे यांनी केले.

Related posts