पंढरपूर

गुंजेगांव येथे बळीराजा शेतकरी संघटनेचे अमरण उपोषण.

पंढरपूर मंगळवेढा – उजनीच्या उजव्या कालव्यावरील मंगळवेढा येथील गुंजेगाव – अहमदाबाद या दोन गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे नूतनीकरण करणे व बंधारा दुरुस्ती करणे या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने 15 सप्टेंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार आज बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हाळणवर यांच्यासह गुंजेगांव येथील शेतकरी यांनी उपोषण सुरु केले.या आंदोलनाची दखल घेत भीमा पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण ,श्री.सुरडकर व शाखा अभियंता श्री. कोळवले यांनी उपोषणस्थळी येऊन बळीराजा शेतकरी संघटनेच्या उपोषणकर्त्यांना त्यांनी दिलेल्या मागण्याबाबत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल,सदरचा प्रस्ताव महाराष्ट् कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्या कार्यालयाच्या सहमतीने सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल,असे लेखी आश्वासन बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

तसेच मान नदीवरील गुंजेगाव बंधारा गळती आणि विविध मागणीसाठी तसेच येथील बंधाऱ्याची गळती थांबविण्यात यावी. बंधाऱ्यात जास्तीत जास्त पाणी थांबून पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा होईल. या संबंधित ठेकेदारांना तात्काळ आदेश दिल्यानंतर व लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हाळणवर यांनी सांगितले.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर ,बिराप्पा मोठे,श्री.ढोणे मंगळवेढा तालुकाध्यक्ष दामाजी मोरे, मंगळवेढ्याचे बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे ,अंकुश गरंडे ,पंढरपूर तालुका अध्यक्ष तानाजी सोनवणे, दत्तात्रय वरपे, नितीन काळे,यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व या परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

Related posts