अक्कलकोट

आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी के . अंकित यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून स्विकारला पदभार.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी के . अंकित हे अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून २८ ऑक्टोबर रोजी पदभार स्विकारला.

या आधी अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पहात होते तेथील त्यांचा कार्यकाल काल समाप्त झाला .प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी अक्कलकोट पंचायत समितीचा पदभार स्वीकारला विद्यमान गटविकास अधिकारी महादेव कोळी हे एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेल्याने त्या जागी के . अंकित हे अल्पकालावधीसाठी रुजू झाले . यावेळी पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड व उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते .

पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड व उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी पुष्पगुच्छ देऊन सहाय्यक जिल्हाधिकारी के . अंकित हे अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून त्यांचे स्वागत केले.

Related posts