Blog

माणसात देव पाहिला मी—

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद।

============================================================================================

सध्या आपण सर्वजण भयानक अशा परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहोत. कोरोना महामारी च्या भयंकर अशा वादळाशी झुंजत आहोत या वातावरणात जीवन कंठत आहोत शासनाच्या नियमानुसार सर्व नियमांचे पालन ही करीत आहोत पण कोरोना काही थांबायचे नाव घेतच नाही !या बंदमुळे लॉक डाऊन मुळे सर्वजण कंटाळलेले आहेत, उदास- उदास हताश, निराश, झालेल्या अवस्थेत वेळ घालवत आहेत. सर्वजण घरात बसूनच आहोत पण खरं पाहता बाहेर डोकावून पाहिलं तर खरे कोरूना चे स्वरूपआपल्यासमोर येईल आपल्यातीलच पोलीस दिवस रात्र आपली ड्युटी बजावत असताना दिसत आहेत अशा भयंकर वातावरणात जनतेची सेवा करीत आहेत! चौका चौका मधून रस्त्या-रस्त्यावर पाहिजे त्याला मार्गदर्शन व मदत करीत आहेत भुकेलेल्याला ,गरीब ,रस्त्यावर फिरणाऱ्या सर्वांनाच भोजनाची व्यवस्था करताना दिसून येत आहेत.

रुग्णांना मदतीचा हात देत आहेत व त्यांना त्यांच्या कुटुंबियांना दवाखान्यापर्यंत नेण्याची व्यवस्था ही करीत आहेत हे कोरोणा योद्धाच आहेत जे देव रूपाने सतत काम करीत आहेत. काम करता करता जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी बसून जेवणाचा डबा काढून कसं बस खात आहेत आपल्या जेवनातील अर्धे जेवण दुसऱ्याला देत आहेत या प्रसंगातून त्यांची माणुसकी दिसून येते. दुसरा प्रसंग आपण पाहिला तर आपल्याला दवाखान्यातील डॉक्टर्स व नर्स सिस्टर ,यांचा सांगता येईल दिवसभर चोवीस तास कोरोना किट वापरून, आलेल्या रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत त्यांची विचारपूस करून त्यांचे औषध गोळ्या ,वेळेच्या वेळी सलायन व त्यांची सर्व सुरक्षा करण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करीत आहेत त्यांच्या रूपाने ही प्रत्यक्ष देवच तिथं कार्य करीत असल्याचा भास होतो प्रामुख्याने आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचा आटोकाट पणे प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत!

म्हणजेच त्यांच्या रुपाने ही देवाचाच स्पर्श होतो आहे! तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी यांचे या काळातील कार्य उल्लेखनीय आहे घंटागाडी असेल सर्वत्र शहरभर फिरून संपूर्ण शहरातील कचरा शहराबाहेर दूर नेऊन टाकने, रस्ता स्वच्छता ,नाल्या साफसफाई करणे ,हे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे या कोरोना महामारी च्या काळात सर्वत्र बंदी आहे लॉक डाऊन सुरू आहे अशावेळी सर्व मंदिर देवालय पूर्णपणे बंद आहेत तेव्हा ही सगळी देव गेली कुठे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे सहाजिकच आहे .तरीही सर्व देव माणसांना रुग्णांना मदत करण्यासाठी असे मानवाच्या रुपाने सेवा करीत आहेत हे आपले माणसांचे खूप मोठे भाग्य आहे! या माणसातच खरोखरच देव दिसत आहे! आपण सर्वांनी विचार केला तर बिचारे दूधवाले असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे असतील, किंवा ज्यावर आपण भोजन बनवतो तो गॅस सिलेंडर वाले, असतील तसेच ताजा ताजा भाजीपाला व फळ वाले आपल्या दारासमोर आणून आपल्याला पुरवणारे असतील हे भयंकर अशा वातावरणात आपला जीव मुठीत धरून आपली एक प्रकारे सेवाच करीत आहेत व आपल्यासाठी देवच बनून येत आहेत !

आपल्याला रुग्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचे आहे आणि अशा संध्याकाळच्या वेळी अचानक आलेली रिक्शा,आलेला रिक्षावाला हे कोरोणा योद्धाचे काम आहे! अत्यावश्यक सेवेमधील डॉक्टर्स ,नर्सेस, तसेच मेडिकल स्टोअर्स वाले हेही कोरोणा योद्धाचे दिवस व रात्र काम करीत आहेत! तसेच आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे जी कोणाच्या नजरेला येत नाही ते म्हणजे चोवीस तास वीज पुरवठा करून आपली सर्वांची सेवा करणारे सर्व वीज कर्मचारी त्यांच्यामुळे आपण घरी उन्हाळ्याच्या या कडक वातावरणात तसेच कोरोनाच्या या भयंकर वातावरणात फॅन, कुलर ,लाईट ,याबरोबरच आपला टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, सर्व तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्यामुळेच करीत आहोत. एवढेच नाही तर आता आपण हॉस्पिटलचे उदाहरण घेऊया ज्या ठिकाणी हजारो पेशंट आहेत ,रुग्ण आहेत, आयसीयू वॉर्डमध्ये आहेत व त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा असेल किती संवेदनशील व महत्त्वाची सेवा देणारे हे कर्मचारी वंदनीय आहेत! अशाप्रकारे कित्येक जण आपला जीव मुठीत घेऊन अहोरात्र कार्य करताना दिसून येत आहेत

संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात ही सेवा अखंडपणे चालू आहे एक प्रकारे ही राष्ट्र सेवा, देश सेवा ,देशप्रेम, राष्ट्र प्रेम व्यक्त करत आहेत विचार करा या सर्वांना शक्ती, बळ ,प्रेरणा देणारा तो देवच आहे !या सर्वांच्या अशा कार्याला खरोखरच त्रिवार नमन!! या सर्वांच्या रूपाने प्रत्यक्ष देव पाहिला मी! आज मी देव पाहिला !!असा भास झाल्याशिवाय राहत नाही याचप्रमाणे सर्वत्र मोठ-मोठे अधिकारी-कर्मचारी शिक्षक, आशा कार्यकर्ता ,ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कळत नकळत आपली सेवा करीत आहेत त्या सर्वांना सुद्धा त्रिवार नमन! माणूस आपल्या सोबत काही घेऊन जात नाही कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा व विश्वासाने कामाला लागा. आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करा व एक विचार असणाऱ्यांची मैत्री करा त्यांच्यासाठी वेळ द्या म्हणजे ते आपल्या सुख-दुःखात वेळ देतील व सहभागी होतील आपल्या आयुष्याचं गणित आपल्याला स्वतःलाच सोडवायचे आहे त्यामुळे स्वावलंबी व्हा व आपली जबाबदारी स्वीकारून कार्याला लागा जबाबदारी ला घेऊन किंवा झटकून टाकता येत नाही ते पुन्हा फिरून तुमच्याकडेच येते म्हणून सेवाभाव ठेवून सतत कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्याला मदत करा, घरीच रहा, सुरक्षित रहा ,पुन्हा एकदा अशा कोरोना संकटाच्या काळात प्राणपणाला लावून लढणाऱ्या सर्व कोरणा योद्धांना त्रिवार नमन !!नियम पाळा, कोरोना टाळा ! धन्यवाद।🙏🏻🙏🏻

Related posts