तुळजापूर

महावितरण चा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

पुरूषोत्तम विष्णु बेले,
चिकुंद्रा / प्रतिनिधी.

वर्षभर कष्ट करून राबराब राबून शेतकरी पिक आपल्या शेतात उभे करीत असतो अन तो हातोंडाशी आलेला घास आधी परतीच्या मुसळधार पावसाने तर उरलेले पिक महावितरण च्या निष्क्रिय कारभारामुळे गेल्याचे चित्र चिकुंद्रा दिसते आहे. चिकुंद्रा येथील भगवान रंभाजी गायकवाड, नंदकुमार गायकवाड, सतीश गायकवाड, गोरोबा गायकवाड या शेतकऱ्यांनी कोरोना सारखी महामारी चालू असताना आपल्या शेतात पाच पन्नास हजार रुपये खर्च करून उसाचे पिक लावले पण परतीच्या मुसळधार पावसाने उभा उस आडवा झाला ते संकट जात न जाते तोच, शेतातून गेलेल्या तारांचे घर्षण झाले अन् ठिणगी पडली बगता बगता या ठिणगी चे वणव्यात रूपांतर झाले अन् जवळपास पाच एकर उस जळून खाक झाला. जवळपास वर्ष भराची कमाई पाण्यात गेली ऐन दिवाळी च्या पुढे बळीराजा पुढे दोन्ही संकट आली.

आता या शेतकऱ्यांनी जगाव की मराव असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.महावितरण कर्मचारी यांना वारंवार शेतातून गेलेल्या तारा काढण्यासाठी शेतकर्यांनी सांगून देखील यावर कार्यवाही झाली नाही. दरम्यान महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे आमचे नुकसान झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे असून याची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत तसे न केल्यास पर्यायी महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा नुकसान ग्रस्त शेतकर्यांनी दिला आहे.

Related posts