उस्मानाबाद 

कळंब-नळाला येतंय चक्क गटारीतील पाणी नगरपालिकेचे मात्र कानावर हात

प्रतिनिधी-सलमान मुल्ला* 
याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरातील गणेश नगर भागांत रविवारी सकाळपासून घरातील नळांमधून गटारातील सांडपाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
पिण्याच्या पाण्यातूनच सांडपाणी येऊ लागल्याने आम्ही पाणी न पिताच तडफडून मरायचे की काय, असा संतप्त सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे.
रविवारपासून हे सांडपाणी घराघरांत येऊ लागल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. घरात दुर्गंधी कोठून येते हेच आधी समजून येत नव्हते. मात्र नंतर नळाद्वारे सांडपाणी येत असल्याचे लक्षात येताच नागरिक हवालदिल झाले आहेत. पालिकेने तातडीने या सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
गणेश नगर  भागात 50 ते 60 घरे आहेत. या भागातील नळाजवळ खुल्या गटारी असल्यामुळे लिकेज झाल्याची शक्यता आहे.

नाल्याची स्वच्छता होत नसल्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. कर्मचारी नाल्या साफ करत नसल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. गटारातील पाणी नळामध्ये मिर्शित होत आहे. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी येत असून जीवजंतू निघत आहे. हे पाणी प्यायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तर पिण्याचे पाणी खराब येत आहे व पाण्याचा वासही ड्रेनेज च्या पाण्या सारखा येतोय. येथील नागरिकांना बाहेरून जार च पाणी विकत घेऊन प्यावे लागते आहे.आशा दूषित पाण्याने नेमकं काय करावं हाच प्रश्न या भागातील नागरिकांना पडलाय..
याबाबत कळंब नगरपालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक करतायत…

Related posts