उस्मानाबाद  तुळजापूर

सुर्डी येथील बालाजी रोहिले यांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांचा मदतीचा हात

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी,

गेल्या काही दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्ययात प्रचंड अतिवृष्टी झाली या अतिवृष्टी मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सुर्डी या गावांमधील बालाजी रोहिले यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा यांच्यावरती वीज कोसळून तिघे जण जखमी झाले होते त्यांच्यावरती शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचार चालू होते.

उपचारादरम्यान डॉक्टरांनी एम आर केल्यानंतर पुढील उपचारासाठी बार्शी किंवा सोलापूर या ठिकाणी जाण्यास सांगितले मात्र बालाजी रोहिले यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने ते बार्शी किंवा सोलापूर येथे उपचार घेऊ शकत नव्हते शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांना समजतात 20 % राजकारण व 80% समाजकारण या शिवसेनेच्या तत्वानुसार वरून बालाजी रोहिले यांना पुढील उपचारासाठी रोख रक्कम 20000/ हजार रुपये देऊन पुढील उपचार करण्यास संगीतले.
शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमानी व अतिष पाटील यांच्या हस्ते रोख 20000/ रक्कम बालाजी रोहिले यांना देण्यात आली त्यावेळी वडगाव विभागप्रमुख सौदागर जगताप गणेश सगर अभिजात साठे नितीन भांगे व इतर उपस्थित होते

Related posts