महाराष्ट्र

सजेदा इलेक्ट्रिकल्सची साथ त्यांनी केली अंधारावर मात

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थात ०३ जून रोजी झालेल्या महाभयंकर निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात संपूर्ण माणगांव तालुक्यातील जनतेचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये तालुक्यातील बहुतांश लोकांची घरे, आंबा काजूच्या बागायतींंचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्याच बरोबर माणगांव तालुक्याच्या शहर आणि ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात सर्वत्र वीज वितरण करणार्या महावितरण कंपनीची वीज वितरण यंत्रणा जमीनदोस्त झाली होऊन महावितरण कंपनीचे अतोनात नुकसान झाले.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नेस्तनाबूत झालेली वीज वितरण यंत्रणा पुनःश्च उभी करून विद्युत पुरवठा पुर्ववत करून माणगांव तालुक्यातील जनतेचे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करून ते महावितरण च्या माध्यमातून पुनःप्रकाशित करण्यासाठी माणगांव तालुका महावितरण विद्युत अभियंता श्री. विजय मोरे साहेब, श्री. यादव साहेब, श्री. सातपुते साहेब, यांच्या कुशल नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व विभाग निहाय विद्युत तंत्रज्ञ, लाईनमन, वायरमन यांच्यासह महावितरणची सर्व कर्तबगार टीम आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी महावितरणने तैनात केलेल्या महावितरणेतर बाह्य टीम मधील सर्व वर्कर्स आणि त्या त्या ठिकाणचे सर्व गावकरी यांच्या प्रचंड अथक आणि निरंतर प्रयत्नानंतर माणगांव तालुका विभागवार दिनप्रतीदिन अंधारावर मात करून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे वाटचाल करत आहे.


निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेली महावितरणची विद्युत वितरण यंत्रणा आणि विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सजेदा इलेक्ट्रिकल्सचे प्रोप्रायटर श्री. सागर पानसकर यांच्या विद्युत योद्धा टीम मधील श्री. देवेंद्र हिरे, तुषार निकम, अतुल हिरे, बाळासाहेब निकम, मनोज निकम, विकी गायकवाड यांच्या टीमने रायगड जिल्ह्यातील महावितरणचे अनुक्रमे सुधागड पाली सेक्शन, नागोठणे सेक्शन, माणगांव तालुका आणि माणगांव तालुक्याच्या खरवली विभागातील साले, उमरोळी, खरवली, सुरव,चेरवली, पेण तर्फे तळे, आमडोशी आणि बोरघर गावातील महावितरणची जमीनदोस्त झालेली विद्युत वितरण यंत्रणा ( लाईटचे पोल, तारा, ट्रान्सफॉर्मर इत्यादी ) पुर्ववत करण्यासाठी माणगांव तालुका महावितरण विद्युत अभियंता श्री. विजय मोरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली या विभागातील वायरमन श्री. अविनाश सोलंकी व गावकरी यांच्या सहकार्याने पुर्ववत करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल एक महिना तहान, भूक व स्वतः चे आरोग्य याकडे लक्ष न देता उन वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता अथक परिश्रम घेऊन तब्बल एक महिन्या नंतर विद्युत पुरवठा पुर्ववत करून सदरची गावें प्रकाशित केली. आणि या विभागातील नागरिकांचे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले. त्यामुळे या सर्व विद्युत योद्धयांना त्यांच्या कार्याला मानाचा सलाम.

Related posts