दक्षिण सोलापूर

हत्तरसंग ग्रामपंचायत ९ पैकी ८ जागा बिनविरोध निवड १ जागेसाठी निवडणूक

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना आणि भीमा नदीच्या काठावर वसलेले हत्तरसंग गाव हे सुमारे १७५० लोकसंख्या असलेले गाव असून दिनांक ३०डिसेंबर २०२० रोजी सौ लक्ष्मीबाई हालमनी यांची समोरील उमेदवार आपलं उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने बिनविरोध निवड करण्यात आले होते.

वॉर्ड क्रमांक १ मध्ये एक जागेसाठी निवडणूक लागली आहे.निवडणूक नामनिर्देशन अर्ज माघार घेण्यासाठी ४ जाने २०२१ हे अंतिम तारीख असल्याने यावेळी श्री महालिंगेश्वर ग्रामविकास पॅनलचे एकूणच ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. बिनविरोध करण्यात आलेले उमेदवार सौ लक्ष्मीबाई हालमनी,सौ.श्रीदेवी बिराजदार,सौ निकिता बिराजदार,धर्मराज पुजारी,पत्रकार अशोक सोनकंटले,बीरप्पा गायकवाड, त्रिशला गायकवाड,आणि रेश्मा गायकवाड यांची समोरील उमेदवारानी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने बिनविरोध निवड झाले आहे

यासाठी श्री महालिंगेश्वर ग्रामविकास पॅनल प्रमुख बसवराज बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली आणि,बापूराव पाटील, वसंत पाटील,धुंडाप्पा खसगे,चनप्पा बिराजदार,राजकुमार टाकळी, बसवराज सलगोडे,जगदेव गायकवाड संगप्पा कांबळे, दिलीप गायकवाड, विजयकुमार गायकवाड आणि सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.

Related posts