Blog

बालपणीचा काळ सुखाचा – कोरोनावर मात करण्याचा—

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

======================================================================================================

मानवी जीवनात सुख आणि दुःख हे दोन पैलू असतात सुख आणि दुःखा शिवाय मानवी जीवन परिपूर्ण होत नसते मनुष्य हा भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत आहे सुख पुढे पुढे व मनुष्य मागेमागे ऊन सावली सारखा बरोबर सतत खेळ चालू आहे असा प्रकार दिसून येत आहे आज जगात सर्वात सुखी आनंदी जर कोण असेल तर ते तर ती लहान मुले! म्हणतात ना लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! ते काही खोटं नाही “बालपणीचा काळ सुखाचा” हा पाठ सुद्धा आपण लहानपणी अभ्यासला आहे व सर्वांनी बालपणीचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे .

नेहमी हसत खेळत ,हुंदडत, भांडत राहण्याचा काळ, खेळणे, पळणे, हसणे फुला फुलपाखराप्रमाणे बागडण्याचा काळ म्हणजे बालपण होय. म्हणूनच संत माऊली म्हणतात “लहाणपण देगा देवा ,मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार” बालपण म्हणजे अगदी फुलासारखे कोमल मनाचे, कोमल हृदयाचे ,कोमल विचारांची, कशाचे दुःख नाही, व्यथा नाही ,काळजी नाही ,संकट माहिती नाही, समस्या माहिती नाही, फक्त मिळेल ते आनंदाने खाणे व आपल्या प्रिय परीवारा सोबत राहणे. आजच्या कोरोणा महामारी च्या काळात आठवण येते ती बालपणीच्या सुखाची, आनंदाची ,आज सर्वजण वेगळ्याच ताणतणावात जगत आहोत डोक्यावर असं कुठलं तरी ओझ ठेवल्यासारखं जीवन जगत आहोत उदासवाणे, निराश वाने, कंटाळवाणे, आजचा दिवस आनंदात गेला, उद्याचा दिवस काय घेऊन येईल? हे देवच जाणे बालपणातील साधारण पाच ते आठ वर्षापर्यंत चा कालावधी कसल्याही समस्येशीवाय आपले जीवन व्यतीत करतो

आई वडील, बहीण भाऊ यांच्या प्रेमामुळे सहवास व सहकार्यामुळे त्याला आपले जीवन अत्यंत सुखी व आनंदी वाटते तो या रेशमाच्या धाग्या मध्ये बांधलेला असतो यावेळी कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये नसते व यावेळी आजी-आजोबांची माया ती वेगळीच! या निखळ प्रेमाच्या सावलीत वाढणारी ही लहान मुले व त्यांचं बालपण खरोखरच खूप आनंदी असतं आजच्या या महामारी च्या काळात हे बालपण सुद्धा हरवल्यासारखं काहीसं वाटतं! याना ना नोकरीची चिंता ,ना भाकरीची चिंता! ना राजकारण-समाजकारण, ना शेती ना बाडी निखळ प्रेम, प्रेमळ मनाने ते सारखे पळत राहतात, चंचल राहतात, त्यांना ना छळ, कपट माहिती ना द्वेष भावना ना पाप पुण्य ते फक्त आपल्याच खेळात मग्न असतात! किती गोजिरवाणे किती गोड किती निष्पाप व किती मोकळ्या मनाची असतात ही बालके दिसेल त्याला बोलत अनेक प्रश्न विचारत असतात लहानपणीच विश्व काही वेगळंच असतं कुत्र्यांची पिल्ले सांभाळणे, चिमण्या ,शेळ्यांची पिल्ले, फुले, फुलपाखरे, गायची गाईची वासरे, यांच्यासोबत खेळण्याची खूप हाऊस मौज व आनंद मिळतो. काही मुलांना भातुकलीचा खेळ खूप आनंद देतो, भातुकलीच्या खेळामध्ये रमून जातात.

लहान मुलांना यात्रा, जत्रा ,शाळेची सहल ,कौटुंबिक सहल, नदीत ओढ्यात ,विहीरीत पोहण्याचा आनंद तो निराळाच असतो याच सोबत मैदानावरील विविध खेळ खेळण्यातच त्यांचा तो दिवस कसा जातो हे कळतच नाही अशावेळी त्यांना जेवणाचे सुद्धा भान राहत नाही ते खेळांमध्ये भान हरपून जातात भारत हा सणांचा देश आहे ,तसेच विविध जाती ,धर्म ,पंथ, संप्रदायातील सण-उत्सव हे खूप मोठे व आगळे वेगळे वैशिष्टपूर्ण असतात मनाला आनंद देणारे असतात हे तर लहान बालकांना खूप खूप आनंद देणारे असतात नवीन कपडे, नवीन खेळण्या, नवीन मित्र, नवीन खेळ, याचा आनंद फक्त आणि फक्त बालपणातच मिळतो एकदा का बालक मोठे झाले विशिष्ट वयोमान संपले कि झाले! जस-जसा तो मोठा होऊ लागतो तसातसा त्याला कळू लागते चांगले काय ,आणि वाईट काय? दुःख तर त्यांना काहीच माहिती नसते म्हणून देवाला सुद्धा लहानपण खूप खूप आवडते आपण जगाचा निर्माता,विश्वकरते भगवान गोपाल श्रीबालकृष्ण व त्यांचे संवगड़ी, कृष्णाच्या बाललीला आपण वाचल्या आहेत, टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका, वेगवेगळ्या पिक्चर मधून आपण पाहिलेल्या आहेत तसेच श्री प्रभू श्री राम ,लक्ष्मण ,भरत, शत्रुघ्न यांचे बालपण ही आपण वाचनाने किंवा रामायण कथेतून ऐकलेलं आहे तसेच ध्रुवबाळ, भक्त प्रल्हादाची उदाहरणे इतिहासातील दाखले आपल्याला सांगता येतील. श्रीकृष्णाच्या बाललीला तर जग प्रसिद्ध आहेतच आजच्या परिस्थितीचा विचार केला तर कोरोनाच्या भयंकर संकटात जर कोणी सुखी असेल तर ही अशी लहान बालके! ना त्यांना कोरोणा महामारी ची काळजी , ना वाढणाऱ्या संख्येची भीती, ना चिंता! ना शाळेची काळजी, त्यांना तर हवी आहे फक्त सुट्टी फक्त सुट्टी उन्हाळी सुट्टी!!

आजच्या परिस्थितीत खरी गरज आहे या मुलांना असेच हसत-खेळत राहण्याची ठेवण्याची. शाळा बंद, महाविद्यालय बंद, संस्कार केंद्र बंद ,व्यायाम शाळा बंद, मग आता या लहान मुलांना संस्कार मिळणार कसे? त्यांचा व्यायाम होणार कसा, त्यांचे आरोग्य सुरक्षित सुदृढ राहणार कसे? मूल्यसंस्कार घडविण्याची पूर्ण जबाबदारी ही यावेळी पालकावर येऊन ठेपली आहे, पालकावर व त्या कुटुंबावर येऊन ठेपली आहे अशा परिस्थितीत ही सर्वांनी आपल्या मुलाबाळांची काळजी घेणे शिक्षण नव्हे तर संस्कार घडविणे, धाडसी बनविणे, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम या चालू घडीच्या पालकाना करावयाचे आहे.बाल पिढीला घड़वायचे आहे. नाहीतर ही हसती, खेळती आनंदी पिढी आपल्या हातून अलगद निसटून जाण्याची भीती आहे

शाळा जरी बंद असल्या तरी जीवनात विविध कलांचे मार्ग आहेत जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप काही आपल्याला करता येईल उदाहरणार्थ चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, वेगवेगळी डिझायनिंग कला, सुंदर रांगोळी प्रकार ,मूर्तिकला, तसेच वादन कला, तबला वादन, मृदंग वादन, ढोलकी वादन, हार्मोनियम वादन, बासरी वादन, सितार वादन ,कोलाज चित्र, तसेच डान्स प्रॅक्टिस, त्याचबरोबर अक्षर लेखन किंवा सुंदर हस्ताक्षर यापेक्षा वेगळे काही करता येइल. मातीकाम करणे, माती पासून विविध वस्तू किंवा किल्ले बनवता येईल एवढेच नव्हे तर मुलांना ज्या कामात आवड आहे असे छोटे छोटे लघु उद्योग आपण त्यांना शिकवू शकतो मुलींसाठी शिवणकला, डिझायनिंगचा कोर्स, रांगोळी, हस्तकला इत्यादि या बालकांना लॉक डाऊन च्या काळात किंवा सुट्टीच्या कालावधीत आपण मार्गदर्शन करून आनंदी ठेवू शकतो व आपणही आनंदी राहू शकतो मुलांच्या अभ्यासावरील ताण कमी करू शकतो गेल्या वर्षभरापासून मुलेही मोबाईल व टीव्हीला चिकटून बसलेली आहेत! अभ्यास तसेच तणावपूर्ण विविध गेम यामुळे ते सतत तणावग्रस्त दिसून येतात रात्रंदिवस मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, टॅब विशेषतः शहरातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे त्यातच या करुणा महामारी च्या सतत येणाऱ्या बातम्यांचा ओघ या सर्व ताण तणावापासून मुलांना वेगळे काही करण्याची संधी सर्वांनी उपलब्ध करून त्यांचे जीवन आनंदी बनवले पाहिजे

यामधे मुलांचीही काही चूक नाही,आज खरी गरज आहे ती या मुलांना आरोग्याच्या बाबतीत सुरक्षितता ठेवण्याची मुलांचे आरोग्य चांगले सुदृढ ठेवणे ही आज आपल्या समोर फार मोठी समस्या आहे त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे व आनंदी ठेवणे हेच सदया तरी आपण करू शकतो काळजी घ्या,घरिच राहा,सुरक्षित राहा!आपले कुटुंब, आपली जबाबदारी पाळा!
🙏🏻🙏🏻धन्यवाद।

Related posts