उस्मानाबाद  कळंब महाराष्ट्र

बिलोली घटनेतील आरोपींना फाशी द्या, टिपू सुलतान ब्रिगेडची मागणी.

सलमान मुल्ला,
कळंब प्रतिनिधी.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या मार्फत निवेदन देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. दिनांक ०९ डिसेंबर २०२० रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील २७ वर्षीय अनाथ आणि मूकबधिर मुलीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

अत्याचार आणि दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाला त्या घटनेत सोबतीला आणखीन कोणी वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी! तसेच आरोपीला महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असलेल्या “महिला अन्याय अत्याचार विरोधी कायदा” म्हणजेच “दिशा किंवा शक्ती” कायद्याअंतर्गत २१ दिवसाच्या आत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवुन लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अकिब पटेल यांची या निवेदनावर सही आहे. पटेल यांच्यासह नितीन वाडे,मुजम्मिल पटेल,इम्रान मुल्ला,इस्तियाक काझी,अनिस तांबोळी,शाहरुख सय्यद,उमेश लोंढे आदीजण उपस्थित होते. या दरम्यान तुमच्या भावना शासनापर्यंत नक्की पोहचवू असे आश्वासन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिले.

Related posts