उस्मानाबाद 

पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांचा सोमवार व मंगळवारी उस्मानाबाद दौरा.

उस्मानाबाद,दि.23(प्रतिनिधी):-

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख हे 25 व 26 जानेवारी 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार,दि.25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 06.00 वाजता शासकीय मोटारीने अहमदनगर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 09.30 वाजता उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह, येथे आगमन. सकाळी 10.00 वाजता जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कार्यकारी समितीच्या बैठकीस उपस्थिती.(स्थळ-शासकीय विश्रामगृह, शिंगोली.) सकाळी 10.30 वाजता महावितरण उस्मानाबादचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकडे प्रयाण.सकाळी 11.00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.

दुपारी 12.00 वाजता महाआवास अभियान(ग्रामीण) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उदघाटन, दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा क्रीडा संकूलाबाबत आढावा बैठक. दुपारी 12.45 वाजता जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चित समिती बैठक (शासकीय विश्रामगृह,शिंगोली, उस्मानाबाद). दुपारी 01.00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, येथून शासकीय विश्रामगृह,शिंगोली कडे प्रयाण. दुपारी 01.15 वाजता शासकीय विश्रामगृह,शिंगोली, येथे आगमन व राखीव. दुपारी 02.00 वाजता शासकीय विश्रामगृह,शिंगेाली, येथून मौजे वडगांववाडी (ता.लोहारा) कडे प्रयाण. दुपारी 02.45 वाजता मौजे वडगाववाडी, येथे आगमन व पाझर तलाव दुरूस्तीच्या कामाचे उदघाटन. दुपारी 03.00 वाजता वडगाववाडी, येथून उमरगा कडे प्रयाण.दुपारी 03.30 वाजता उमरगा येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण. सायंकाळी 04.30 वाजता उमरगा येथून शासकीय विश्रामगृह, शिंगोली, कडे प्रयाण. सायंकाळी 05.45 वाजता शासकीय विश्रामगृह शिंगोली, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.

मंगळवार दि.26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 08.55 वाजता शासकीय विश्रामगृह,शिंगोली, येथून श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकूलाकडे प्रयाण. सकाळी 09.14 वाजता श्री.तुळजाभवानी क्रीडा संकूल, येथे आगमन. सकाळी 09.15 वाजता भारतीय प्रजास्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ. सकाळी 09.50 वाजता श्री. तुळजाभवानी क्रीडा संकूल, येथून समर्थनगरकडे प्रयाण.सकाळी 09.55 वाजता समर्थनगर, येथील जि.प.लिपिक वर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उदघाटन. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मौजे सोनई (ता.नेवासा, जि.अहमदनगर) कडे प्रयाण.

Related posts