उमरगा उस्मानाबाद 

उमरगा येथे पालकमंत्री मा. शंकरराव गडाख यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील उमरगा येथे शासकीय विश्रामगृहाचा लोकार्पण सोहळा मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीच्या बंधासाठी वर्षोनुवर्षे चालत असलेली भांडणे यातून अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. यातून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रभावी पणे राबवुन ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MREGS) मधून रस्ते करण्यास चालू केली आहेत त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेब काम कौतुकास्पद आहे.

मृद व जलसंधारण मंत्री साहेब यांनी जिल्ह्यातील बंधारे बांधणे व दुरुस्ती साठी 45 कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री महोदयांनचे खासदार या नात्याने खा. ओमराजे निंबाळकर यांनी आभार मानले. तसेच महोदयांनकडे विनंती केली की, उस्मानाबाद (धाराशिव) शहर जिल्ह्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी विस्तारीकरण करून नविन VIP शासकीय विश्रामगृह करावे. ते पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या काळात होईल याबाबत तीळ मात्र शंका नाही असा विश्वास यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.

उमरगा-लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत चांगले केल्याबद्दल प्रशाकिय अधिकाऱ्यांचे व आमदार साहेबांचे अभिनंदन यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी केले. तसेच 65 महामार्ग हा राज्य शासनाकडे होता तो आत्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाला असुन सदरील महमार्गाच्या देखभाल व दुरुस्ती साठी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी खा.ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उमरगा-लोहरा मतदारसंघाचे आ.ज्ञानराज चौगुले, माजी जि.प. उपाध्यक्ष केशव (बाबा) पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमिले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उपजिल्हाप्रमुख नामदेव मामा लोभे, अमोल बिराजदार, कार्यकारी अभियंता श्री.कुलकर्णी, अनिल सगर, शिवसेना पदाधिकारी यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related posts