करमाळा

गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देवून गौरव

करमाळा प्रतिनिधी उमेश पवळ
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या वतीने शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्यात तसेच कोविड १९ महामारीच्या काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल करमाळा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार व सन्मानपत्र सभापती गहिनीनाथ(आप्पा) ननवरे उपसभापती दत्तात्रय (काका) सरडे माजी सभापती शेखर (तात्या) गाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग म्हणाले की पुरस्कार मिळणे म्हणजे पुढील कार्यासाठी बळ मिळत असते शिक्षकांची मेडीकल फंडाची कामे नियमित मार्गी लावली जात आहेत तसेच आदर्श समिती च्या मागणीनुसार सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिसीपीएस चा प्रलंबित हिशोब लवकरच पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले
तर सभापती ननवरे यांनी शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत असून या पुढेही कटिबद्ध असल्याचे सांगितले तर उपसभापती सरडे यांनी शिक्षकांचे वेतन विनाविलंब वेतन रक्कम प्राप्त होताच करण्याचा नियमित प्रयत्न केला जात असून तशा सूचना संबंधीतास दिल्या आहेत तर माजी सभापती गाडे यांनी आदर्श समिती च्या वतीने राबवल्या जाणाऱ्य उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रवीण घाडगे पाटील सरचिटणीस बापूराव बरडे ,नितीन व्हटकर , शिवाजी देवकर,संतोष नवले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण घाडगे यांनी तर सूत्रसंचलन बापूराव बरडे यांनी केले तर आभार नितीन व्हटकर यांनी मानले .

Related posts