उस्मानाबाद 

विवेकानंद युवा मंडळातर्फे स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन

उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी – प्रतिक शेषेराव भोसले

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता – राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या विवेकानंद युवा मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले.

त्याचप्रमाणे दिनांक १२ जानेवारी ते १८ जानेवारीपर्यंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत, मंडळातर्फे ‘युवा सप्ताहाचे’ नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, वयोगट १४ ते १८ निबंध स्पर्धा तर वयोगट १८ ते २५ चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी त्यांची नोंदणी ९५७९५९०९२२ या व्हॉट्सॲप क्रमांकावरती करायची असून, यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांना नेहरू युवा केंद्र व विवेकानंद युवा मंडळातर्फे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे मंडळाचे राज्य समन्वयक स्वप्नील देशमुख यांनी सांगितले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, महेंद्रप्रताप जाधव, नागेश बडुरे, श्याम वाघमारे, उमाजी गोरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts