उस्मानाबाद 

विवेकानंद युवा मंडळ यांच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन.

प्रतिनिधी – प्रतिक शेषेराव भोसले
उस्मानाबाद – (धाराशिव)

उस्मानाबाद – येथील विवेकानंद युवा मंडळ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

नेताजी बोस हे युवकांचे खूप मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यात विवेकानंद युवा मंडळ व नेहरू युवा केंद्र हे आदर्शवादी व संस्कार युवक संघटन तयार करण्यास कायम तत्पर असते. “नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून युवकांनी देव, देश आणि धर्मासाठी कार्य करावे” असे विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके यांनी भाषणात सांगितले.

यावेळी उपस्थित युवकांना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सडक सुरक्षा सप्ताहाची’ शपथ देण्यात आली. यावेळी स्वप्नील देशमुख, सलमान सय्यद, रोहन गाढवे, रवी सुरवसे, विजय कोळगे, प्रशांत मते, श्याम वाघमारे, वैभव लांडगे आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts