तुळजापूर

ग्रामपंचायत निवडणूक : सलगरा (दि.) येथे ८६.०८ टक्के मतदान

प्रतिक शेषेराव भोसले
सलगरा दि. (प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील ग्रामपंचायत निवडणुकीची दुरंगी लढत झाली असून, एकुण अकरा जागांसाठी बावीस उमेदवार रिंगणात उतरले होते.

सलगरा दिवटी केंद्र क्र. १० या मतदान केंद्रावर १५ जानेवारी रोजी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन, योग्य ती खबरदारी घेत, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मतदान करण्यात आले. सर्व मतदारांनी आपला हक्क बजावत, आरोग्य कर्मचारी, मतदान अधिकारी, पोलीस प्रशासन आदींना सहकार्य करत मतदान यशस्वीरित्या पार पाडले. अशा प्रकारे २९६० पैकी २५४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण टक्केवारी ८६.०८ इतकी झाली आहे.

तरी या दुरंगी लढतीकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले असुन मतदार कोणाला कौल देतात याची उत्सुकता लागली आहे.

Related posts