सोलापूर शहर

अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने कोरोना जनजागृतीची उभारली गुडी

सोलापूर प्रतिनिधी
अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने गुडी पाडव्या निमित्त कोरोना जनजागृतीची गुडी बलिदान चौक येथे उभी करण्यात आली.
संपूर्ण जगभरामध्ये व भारतामध्ये जो कोरोनाचा उद्रेक होत आहे त्यापासून जनतेचा बचाव व्हावा यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुवत राहणे, हात धुणे शक्य नसेल तर सॅनेटायझर वापरणे, दोन व्यक्ती मध्ये सुरक्षित अंतर ठेवणे या व अनेक संदेश देणारे फलक गुडीला लावण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते
म्हणाले कि, संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षा पासून वेगवेगळ्या सामाजिक संदेश देणारी गुडी उभी करण्यात येते आहे.
सध्या कोरोनाच्या संसर्गजन्य रोग भारता मध्ये पसरलेला आहे. त्या पासून बचाव करणारे नियमांचे पालन करून यंदाचा गुडी पाडवा सण साजरा करण्यात आला व लवकरात लवकर कोरोनाचे सावट दुर व्हावे अशी प्रार्थना गुडी उभारताना करण्यात आली.
यावेळी विनोद कर्पेकर, नरेश मुन्नुरेड्डि, रूपेश दुधनी, संजय कुंभार, सोमा चडचणकर, दादा पवार, मेघराज बोळकवठेकर, बसवराज कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना जनजागृती संदेश
कोरोना से अगर बचना है,
तो मुंह पर मास्क पहनना है, भीड से दूर रहना है,
यह हम सबका कहना है|
जीवन मरण एका श्वासाचं अंतर कोरोनाने ते ही मिटवले अंतर
सतत धुवूया 20 सेकंद हात कोरोनाचा होईल त्यामुळे घात

Related posts