कविता 

देवा काय घडला गुन्हा- – – – –

देवा काय घडला गुन्हा- – – – –

देवा असं कसं झालं
अचानक आभाळ फाटलं
पिके आडवी झाली
शिवार मोडून पडले
शेत पाण्याने वाहून गेल
बांध फुटला ,आनंदाने
डोलनारी पिके धाय मोकलुन
रडू लागली।
शेताचे तळे झाले।
क्षणात होत्याचे नव्हते झाले
देवा असा काय घडला रे गुन्हा?
सरकार धावले,पाहणी केली
पिक विम्यासाठी बैंकेत
खेटे मारून व्याकुळ झाला
देवा काय घडला रे गुन्हा?
कोरोना महामारिने मारल
लाखो जीवाचा खेळ झाला
विषा नूनं घात केला।
उपासमारी रोगराई ने छळ केला।

माणूस मानसात नाही राहिला
देवा काय घडला रे गुन्हा?

नको पैसा आडका,जमीन
जुमला,
आरोग्य धन संपदा दे आम्हाला
देवा माफ् कर ना गुन्हा!!🙏🏻🙏🏻

कवि
देविदास पांचाळ सर
श्री तुळजभवनी सैनिकी विद्यालय, तुळजापुर.

Related posts