बार्शी

ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार विजेते श्री. रणजितसिंह डिसले यांचा खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी,

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार परितेवाडी जि.सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक श्री. रणजित सिंह डिसले सर यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मान दिला जाणारा “ग्लोबल टिचर पुरस्कार” हा मिळाला.

यानिमित्ताने समाजाभिमुख काम करून विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या श्री.रणजितसिंह डिसले सरांची बार्शी येथिल त्यांच्या घरी धारशिवचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर तसेच सोलापूर चे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मा. गणेश वानकर यांनी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी नगरसेवक अरूणदादा बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेशअण्णा पाटील, नगरसेवक विजय चव्हाणसर, पृथ्वीराज (भैय्या) बाफणा, शिवसेना उपतालुका प्रमुख पांडुरंग आबा गपाट, डाॅ.नलगे, बप्पा कसबे आदी उपस्थित होते.

Related posts