पंढरपूर

गादेगावच्या सुपुत्राने वाढवला पंढरपूरचा मान – अभिजीत पाटील.

डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सन्मान केला

सचिन झाडे
पंढरपूर –

पंढरपूर तालुक्यातील गादेगावचे सुपुत्र यशवंत यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई या नामांकित विद्यापीठाची PHD पदवी मिळाली आहे.या पीएचडीसाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पिकांवर अभ्यास हा प्रबंध सादर केला आहे.विज्ञान व तंत्रज्ञान टिस विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभागाला सादर करत सोलापूर जिल्ह्यातील पिकांचे मुल्यमापन करून ५०० पानांचे लिहलेले माहिती व तंत्रज्ञान आणि फळशेती हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील डांळिब, द्राक्षे आणि केळी याप्रमुख पिकांवरती त्यांनी PHD केली आहे.

१९९० सालापासून आतापर्यंत जिल्ह्यात पडणारा पाऊस या तीन पिकांची लागवड, उत्पादन क्षमता, पिकांची होणारी वाढ यावरती सखोल असा अभ्यास करून या पिकांवर पाऊस काळ जास्त झाल्यास किंवा कमी झाल्यास तसेच या पिकांच्या हवामान अंदाज व मार्केटिंग यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा किती वापर केला जातो.याचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे.त्यामुळे त्यांना हा बहुमान मिळाल्याने या “गादेगावच्या सुपुत्राने पंढरपूर तालुक्याचा मान संपूर्ण राज्यात वाढविला आहे असे गौरवोद्गार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे प्रसिध्द उद्योजक अभिजित धनंजय पाटील यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी काढले.गादेगाव ग्रामस्थ व डिव्हिपी उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना सर्व गोष्टीच्या परिणामावरती सरांनी उपाययोजना व सखोल मार्गदर्शन केले आहे.पाच वर्षांची मेहनत करून ध्येय ठेवून केलेले हे काम आहे.

यादव गुरुजींनी म्हणजेच त्यांच्या वडिलांनी दिलेले पाठबळ व आई आणि वहिनींनी दिलेली साथ सरांनी वेळोवेळी बोलून दाखवली. या PHD मध्ये गादेगाव ग्रामस्थांचे विशेषत:आभार मानायला हवेत.तसेच अभिजीत पाटील म्हणाले,गादेगावसारख्या लहानश्या गावातून पुढे येऊन पंढरपूर तालुक्याचा मान सोलापूर जिल्ह्यात व राज्यात सरांनी वाढवून एक मानाचा तुरा त्यांनी रोवला आहे.केलेल्या कामाचा पुढील काळात सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल व ते उत्पादन वाढीस मार्गदर्शन करत राहतील अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी गादेगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल व यादव परिवार उपस्थित होते.

Related posts