कळंब

कळंब येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

तेरणा जनसेवा क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार असून कळंब येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात हा उपक्रम राबवला जाणार आहे. याकरिता डॉक्टर सय्यद मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा सहज व मोफत उपलब्ध व्हावी त्यांना हृदयशस्त्रक्रिया, मणक्यावरील शस्त्रक्रिया, किडनीचे आजार तसेच अन्य महागड्या आजारावरील उपचार व औषध मोफत मिळावे या उदात्त हेतूने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद संचालित तेरणा जनसेवा क्लिनिकच्या वतीने हा उपक्रम जिल्हाभर राबवला जात असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनतेच्या सोईच्या ठिकाणी हे क्लिनिक उभारले जात आहे.

आज दिनांक ४ जानेवारी पासून दर सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या कळंब जनसंपर्क कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी व उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे या उपचार केंद्राचे उद्घाटन तालुकाध्यक्ष अजित बप्पासाहेब पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संतोष कस्पटे,अमजत मुल्ला,प्रशांत लोमटे, माणिक बोंदर,संजय जाधवर,इमरान मुल्ला, अभय गायकवाड व भारतीय जनता पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आज उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी लोकांनी चांगला प्रतिसाद देते अनेकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

Related posts