उस्मानाबाद 

३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य देणार

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू झालेल्या अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील जनतेला काय आवाहन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाईल अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. भारत चीन या दोन देशांत सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकर लागू केली जाईल अशीही घोषणा त्यांनी केली.पुढील 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे.

Related posts