उस्मानाबाद  तुळजापूर

पिंपळा (बु.) ग्रामपंचायत निवडणुकीत एक जागेसाठी लागलेल्या लढतीत माजी सरपंच बाळू सिरसट विजयी.

पुरुषोत्तम विष्णू बेले,
तुळजापूर तालुका प्रतिनिधी.

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) ग्रामपंचायत मध्ये मा. सरपंच बाळू सिरसट यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला.

पिंपळा (बु.) ग्रामपंचायत निवडणूक ही याअगोदर च ८ जागेसाठी बिनविरोध झाली होती. परंतु एक जागेचा तिढा न सुटल्याने येथे एका जागेसाठी तिरंगी लढत रंगली होती. यामध्ये प्रामुख्याने मा. सरपंच बाळू सिरसट, यशवंत डोलारे आणि भीमराव जाधव असे एकूण तीन उमेदवार मैदानात उतरले होते.

निकाल जाहीर होताच, माजी सरपंच मा. बाळू सिरसट यांच्यावर जनतेने आपला विश्वास कायम दाखवत त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले. या निवडणुकीत विजयी उमेदवार बाळू सिरसट यांनी तब्बल २१३ मते मिळविली. यामध्ये दुसरे उमेदवार यशवंत डोलारे यांना ६६ तर भीमराव जाधव यांना ६३ मते मिळाली.

जनतेने माझ्या केलेल्या सेवेमुळे, विश्वास ठेवून पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार…!

मी यापूर्वी ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून तसेच मागील पंचवार्षिक कार्यकाळात सरपंच म्हणून ज्या प्रकारे जनतेची सेवा केली, याचेच फलित म्हणून जनतेने मला एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले त्याबद्दल मी जनतेचे मनक:पूर्वक आभार मानतो. जनतेने ठेवलेला हा विश्वास मी नक्की सार्थ ठरवेन.

– श्री. बाळू सिरसट (नूतन ग्रा.पं. सदस्य)

Related posts