अक्कलकोट

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार.

(प्रतिनिधी अक्कलकोट) –

तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार पाटील यांनी आज पर्यंत आपणास सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. यापुढील आयुष्य स्वामींच्या स्मरणात व्यतीत होत राहावे त्याकरिता समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले असल्याचे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य चन्नबसय्या कौटगीमठ, अशोक मुलगे, संजय याबाजी, बाजार समिती उपसभापती आप्पासाहेब पाटील, देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, विपुल जाधव, इत्यादी उपस्थित होते.

Related posts