तुळजापूर

माजी कॅबिनेट मंत्री.मधुकरराव चव्हाण यांनी दिली किलज गावाला भेट ; हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने करण्यात आले किटचे वाटप.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

किलज ता.तुळजापूर गावात मुसळधार पावसामुळे गावातील शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक लोकांचे घरामध्ये पाणी शिरले होते तर गावात गावातील नदिलगत घरे असणाऱ्या लोकांची घरे ही पाण्याच्या अखंडित प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत. यामध्ये कसलीही जीवितहानी झालेली नाही. या कुटुंबाना या कठीण काळात आधार म्हणून माजी. मंत्री.तथा तुळजापूर तालुक्याचे माजी.आमदार. मधुकरराव चव्हाण आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे बसवराज नरे यांनी भेट दिली. घटनास्थळी सर्व गोष्टींची पाहणी केली. माजी. मंत्री. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते या कुटूंबाना घराचे पुनर्वसन करण्यासाठी घरावरील पत्रे देण्यात आले तर हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष. डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या माध्यमातून संस्थेचे बसवराज नरे आणि प्रबोध कांबळे यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी मा. मंत्री. मधुकरराव चव्हाण , हॅलोचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज नरे, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष-धीरज पाटील, किलज गावचे माजी. सरपंच.लक्ष्मण शिंदे, माजी psi शिवराज मरडे उपस्थित होते.

या कठीण काळात केलेल्या मदतीबद्दल या कुटुंबाने यांचे आभार मानले.

Related posts