तुळजापूर

रोहन देशमुख यांच्या उमेदवारासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांचे श्री तुळजाभवानीकडे साकडे

साईनाथ गवळी,
उस्मानाबाद / तुळजापूर, प्रतिनीधी.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे युवा नेते रोहन देशमुख यांना भाजपातून उमेदवारी मिळावी, यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी महाआरती करून साकडे घातले.

तत्पूर्वी श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीस पहाटे दुग्धाभिषेक करण्यात आला व रोहन देशमुख यांना उमेदवारी मिळविण्यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घातले. या महाआरती वेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रामुख्याने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी किसान मोर्चा मराठवाडा पूर्वचे संपर्कप्रमुख रामदास कोळगे, प्रभाकर मुळे, गजानन वडणे, बाळासाहेब भोसले, सचिन अमृतराव, आनंत बुरांडे, सागर कदम, शिवाजी बोधले, पंकज पाटील, बाळासाहेब शामराज, साहेबराव घुगे, बाबा बेटकर, नागेश चौगुले, अनिल जाधव, हरी वट्टे, सचिन बागल, मकरंद लबडे, औदुंबर जमदाडे, बालाजी शिंदे, महादेव सुरडे, शिवाजी सरडे, अनंत मोरे, दादा जाधव, तुकाराम चव्हाण, लिंबराज साळुंखे, भास्कर बोंदरे, अनिकेत कोळगे, विनोद शिरसागर, काका शेळके, ज्ञानेश्वर मोहिते, अमोल टकले, बालाजी सुरवसे, नंदकुमार माळी, महेश चांदणे, सचिन आडगळे आदीजण उपस्थित होते.

रोहन देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपा संघटन वाढविण्यास मोठे योगदान दिले असून त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते भाजपात जोडले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षाचा आमदार व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार निवडून आणण्यात रोहन देशमुख यांचे मोठे योगदान आहे. लोकमंगल उद्योग समुहाच्या मार्फत अनेक युवकांना रोहन देशमुख यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

रोहन देशमुख यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेतील नामवंत विद्यापीठात झाले असले तरी त्यांनी आपल्या वडिलांचे म्हणजे माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकसेवेचा वारसा जपला आहे. त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये आपल्या यंत्रणेमार्फत मोठी मतदार नोंदणी करून घेतली असून पुणे मतदारसंघ असलेले सर्व जिल्ह्यांमध्ये लोकमंगल उद्योग समूह मार्फत या वर्षात अनेक युवकासाठी मोठा जनसंपर्क आहे.

सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या बालेकिल्ला मध्ये कडवी झुंज दिली होती. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. सुभाष देशमुख यांच्या संपर्काच्या सामाजिक कार्याचा मोठा फायदा रोहन देशमुख यांना होणार आहे. त्याचप्रमाणे माजी राज्यसभा सदस्य व पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती संजय काकडे हे रोहन देशमुख यांचे सासरे असून संजय काकडे यांच्या पश्चिम महाराष्ट्रात जनसंपर्क रोहन देशमुख यांना विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत.

Related posts