उस्मानाबाद  कळंब

शिवजन्मोत्सवानिमित्त कळंबमध्ये पहिल्यांदाच रंगणार फुटबॉलचे सामने.

प्रतिनिधी :-सलमान मुल्ला

: कळंब तालुक्यात पहिल्यांदाचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान खुल्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सिटीझन्स फाउंडेशन आणि मोहेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

1 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता डिकसळ येथील मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल. तर 3 तारखेला अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण संभारंभ पार पडेल. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 15 हजार 391 रुपये, द्वितीय 11हजार 391 रुपये तर तृतीय पारितोषिक 7हजार 391 व उत्तेजनार्थ संघाला 4 हजार 391 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासह मालिकावीर, उत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट स्ट्राईकर, उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट कोच, असे वैक्तिक बक्षिसे देखील ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रवेश फी म्हणून 391 रुपये आकारली जाईल. या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत राज्यातून अनेक संघांनी आपली नाव नोंदणी केली असल्याचे संयोजकांनी सांगितले.

जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं, असे आवाहन देखील मुख्य आयोजक राजकुमार ढगे यांनी केले आहे. कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यात प्रसिद्ध आहे. शहरात शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक वाजत-गाजत तर निघतेच, त्याचबरोबर सामाजिक उपक्रम, व्याख्याने, सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केले जातात. आता त्यात क्रीडा स्पर्धेची देखील भर पडली आहे.

Related posts