अक्कलकोट

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन आदेशान्वये अन्नछत्र मंडळ बंद.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्हा व तालुका प्रशासनाने काढलेल्या आदेशान्वये येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ दि.30 एप्रिल 2021 पर्यंत महाप्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली आहे.

दरम्यान अन्नछत्र मंडळातील नियमित धार्मिक विधी, पुजा, आरती आदी धार्मिक कार्यक्रम नियमित पार पडणार आहेत, भाविकांना पूर्णत: महाप्रसाद सेवा बंद करण्यात आलेली आहे. बुधवार, दि.14 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन असून सालाबादाप्रमाणे या दिवशी धार्मिक कार्यक्रम हे न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमनाथ पुजारी व विश्वस्त यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. भाविकांचा यामध्ये सहभाग होणार नाहीत.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज हजारो भाविक महाप्रसाद घेण्यासाठी येतात. राज्यासह, परराज्य, परदेशांतून ही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या सर्व बाबींचा विचार करुन प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी अन्नछत्र मंडळ या न्यासाने महाप्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts