पंढरपूर

मंद्रूप परिसरात कोरोनाचे नियम पाळा! अन्यथा कारवाई : तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा इशारा

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी

शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नयेत यासाठी विविध नियम,अटी व मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत त्या सर्व सूचना व नियमाचे पालन मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय परिसरातील गावातील जनतेना करावा,नियम व सूचना न पाळणा-या जनतेवर कडक कारवाई करण्यात येईल.असा इशारा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिला आहे. लिंबारे म्हणाले,नागरिकांनी मास्कचा वापर करावा,सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी,प्रत्येकांनी नेहमी सहा फूट सामाजिक अंतर ठेवावेत,साबण व सॅनिटायझरचा वापर हात धुवण्यासाठी करावा.दुकाने,माॅल समारंभ,विविध आस्थापना,संमेलने,मेळावे इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीव्दारेच व्यवस्थापन केले पाहिजे,अशा ठिकाणी येणा-या नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झालेले पाहिजे,सर्व परिवहन व वाहतूक सेवामध्ये लसीकरण घेतलेल्या व्यक्तीनाच परवानगी असेल.मंद्रूप तहसील कार्यालय हद्दीत येणा-या सर्व प्रवासी यांनी लसीकरण केलेले असावेत,तसेच ७२ तासांसाठी आरटी-पीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे.खासगी व अन्य चारचाकीतून वाहतूक करताना कोरोना नियमाचे पालन करावेत अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.मंगल कार्यालय,सभागृहात अथवा बंदिस्त व बंद जागेत घेण्यात येणा-या कार्यक्रमाच्या बाबतीत एकूण जागेच्या ५० टक्के लोकांना परवानगी असेल.संपूर्ण खुल्या जागेत २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.जर एक हजारापेक्षा अधिक लोक एकत्र जमणार असतील तर यांची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी लागेल,अशा कार्यक्रम,संमेलनाचे निरीक्षक म्हणून अधिकारी पाठविण्यात येईल,कार्यक्रमात कोरोना नियमाचे पालन होत आहे की नाही यांचे निरीक्षण नोंदविले जाईल जर नियमाचे भंग झाल्याचे दिसून आल्यास आयोजकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने कोरोना नियमाचे उल्लंघन केल्यास पन्नास हजारांचा दंड केला जाईल,वारंवार नियमाचे भंग केल्यास एक आपत्ती म्हणून कोविडची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था व आस्थापने बंद करण्यात येईल.

Related posts