पंढरपूर

प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

सचिन झाडे –
पंढरपूरः –
‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी, थेट द्वितीय वर्ष व एम.फार्मसी) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ./ बी. टेक.) व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी बुधवार दि.३० डिसेंबर २०२० पर्यंत, प्रथम वर्ष बी. फार्मसी व थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी (डी.एस.वाय) व एम. फार्मसी साठी ३० डिसेंबर २०२० पर्यंत, एम.ई./ एम.टेक. साठी बुधवार, दि.३० डिसेंबर २०२० पर्यंत तर एम.बी.ए. (पदव्युत्तर पदवी) साठी मंगळवार दि.२९ डिसेंबर २०२० अशा स्वरूपात विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (कॅप रजिस्ट्रेशन) मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

यापूर्वी दि.०९ डिसेंबर २०२० पासून प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली होती व दि. २२ डिसेंबर ला संपली होती पण अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाशी संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नव्हती हे पाहून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून व काही अपुऱ्या तांत्रिक बाबी यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून स्वेरी अभियांत्रिकीमध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर मुदतवाढ व प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात प्रवेश अर्जांचे ऑनलाईन कन्फर्मेशन, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील मराठा विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र शासनाचे ई. डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र मिळत असून इच्छुक विद्यार्थी त्या सवलतीचा फायदा घेऊ शकतात.

अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८), प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०), प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) तसेच एम. बी. ए. करीता प्रा. करण पाटील (९५९५९२११५४) तर फार्मसी करिता प्रा. प्रज्ञा साळुंखे (९४०४९९१८११) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related posts