उस्मानाबाद  तुळजापूर

अखेर तुळजापूरकरांची छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतीक्षा संपुष्टात ; विकास प्राधिकरणाच्या बचत निधीतून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बांधण्यास महाविकास आघाडी सरकारची परवानगी.

धाराशिवचे लोकप्रिय खा. मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर येथील शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जनतेचे अधुरे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. महाविकास आघाडी सरकार कडुन तुळजापुर विकास प्राधिकरणच्या बचत निधीतुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बांधण्यास परवानगी दिली आहे.

तुळजापुर जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा नियोजित ठिकाणी बांधण्याची नागरिकांची खुप दिवसापासून मागणी असुन तुळजापुर विकास प्राधिकरणाच्या बचत निधीतून परवानगी मिळणेबाबत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब व नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि.23 जानेवारी 2021 रोजी मागणी केली होती.

त्याअनुषंगाने महाविकास आघाडी सरकारकडून या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत ताबडतोब परवानगी देण्यात आली आहे.

त्याबद्दल मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब व नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, सर्व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री महोदयांनचे तसेच महाविकास आघाडी सरकारचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूरकरांच्या वतीने जाहीर आभार मानले.

तुळजापुर येथे नियोजित ठिकाणी महाविकास आघाडी सरकार कडुन तुळजापुर विकास प्राधिकरणच्या बचत निधीतुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बांधण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे यांच्या पाठपुराव्यास यश आले असल्याने संपूर्ण तालुक्यात मा. खासदारांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related posts