उस्मानाबाद  कळंब

धाराशिव-कळंब मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामासाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर. – आ. कैलास पाटील.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

उस्मानाबाद(धाराशिव) – कळंब मतदारसंघातील नविन कामासाठी 12 कोटी 17 लाख रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे याशिवाय दूरुस्तीच्या कामासाठी दोन कोटी 79 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे, अशी माहिती कळंब-धाराशिवचे विद्यमान आमदार मा. श्री. कैलास पाटील यांनी दिली.

आ. कैलास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कामासाठी कळंब तालुक्यातील गावासाठी 11 कोटी चार लाख तर उस्मानाबाद तालुक्यातील गावासाठी एक कोटी 12 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. तसेच दूरुस्तीच्या कामासाठी उस्मानाबाद तालुक्यातील गावासाठी एक कोटी एक लाख रुपये व कळंब तालुक्यातील गावांसाठी एक कोटी 77 लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे.

नवीन कामामध्ये कळंब तालुक्यातील मोहा गेटेड चेकडॅम क्रमांक गेटेड चेकडॅम एक व दोन, मंगरुळ गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, शेळका धानोरा गेटेड चेकडॅम क्रमांक एक, सैौंदना ढोकी गेटेड चेकडॅम क्रमाक एक, भाटशिरपुरा गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, देवधानोरा गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, बोरवंटी गेटेड चेकडॅम क्रमांक एक, वाटवडा गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, नायगाव गेटेड चेकडॅम क्रमांक एक,दोन, तीन व चार, खामसवाडी गेटेड चेकडॅम क्रमांक एक, दोन व तीन आथर्डी गेटेड चेकडॅम क्रमांक एक, भाटसांगवी गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, ईटकुर गेटेड चेकडॅम क्रमांक एक ते चार, खडकी क्रमांक एक, सात्रा क्रमांक एक, वाकडी क्रमांक एक, बोरगाव धनेश्वरी गेटेड चेकडॅम क्रमांक एक या गावातील कामाचा समावेश आहे.

धाराशिव(उस्मानाबाद) तालुक्यातील तावरजखेडा गेटेड चेकडॅम क्रमांक एक, दुधगाव गेटेड चेकडॅम क्रमांक एक, तडवळा गेटेड चेकडॅम क्रमांक एक या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

दूरुस्तीच्या कामामध्ये कळंब तालुक्यातील आढाळा पाझर तलाव, ईटकुर पाझर तलाव क्रमांक एक व दोन, ताडगाव पाझर तलाव क्रमांक एक, नायगाव पाझर तलाव क्रमाक एक व दोन, मस्सा (खं)पाझर तलाव क्रमांक सहा, सौंदणा (अंबा) पाझर तलाव, पाडोळी पाझर तलाव क्रमांक एक, वडगाव (नि) पाझर तलाव क्रमांक एक, तीन, चार व पाच तसेच वडगाव (जा) पाझर तलाव क्रमांक चार, बोरगाव (बु) क्रमांक एक व दोन, आवाडशिरपुरा पाझर तलाव, एकुरगा पाझर तलाव, गौरगाव पाझर तलाव क्रमांक पाच, सहा, सात व आठ, पिंपरी पाझर तलाव क्रमांक एक, रांजणी पाझर तलाव क्रमांक चार आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

धाराशिव(उस्मानाबाद) तालुक्यातील ढोकी पाझर तलाव, पळसप पाझर तलाव क्रमांक पाच व सहा, गोपाळवाडी पाझर तलाव चार व पाच, कुमाळवाडी पाझर तलाव, उस्मानाबाद पाझर तलाव क्रमांक तीन, राघुचीवाडी पाझर तलाव क्रमांक व दोन, येडशी (सुळकी) पाझर तलाव व वाखरवाडी आदी गावातील कामांचा समावेश करण्यात आला आहे.

या सर्व कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने गावागावात पाण्याचे स्रोत निर्माण होतील, जेणेकरून अधिक जमीन सिंचनाखाली येईल आणि दुष्काळाच्या झळावर नक्कीच मात करता येईल.

मतदारसंघातील जलस्त्रोत वाढविण्यासाठी जलसंधारण विभागाच्या मार्फत निधीची तरतूद केल्याबद्द्ल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील, उपनेते मा.मंत्री प्रा.डॉ.आ. तानाजीराव सावंत, जलसंधारण राज्यमंत्री दत्तामामा भरणे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांचे आभार यावेळी आ. कैलासदादा पाटील यांनी मानले.

Related posts