उस्मानाबाद 

फौजदार नजीरोद्दीन नाइकवाडी यांचा येरमाळा येथील ठाण्यात सत्कार.

उस्मानाबाद प्रतिनीधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले नजीरोद्दीन रशिद नाइकवाडी हे पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांची फौजदार पदी पदोन्नती होऊन एक महिना पुर्ण झाला त्यांचा पत्रकार हुकमत मुलाणी यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात जाऊन नाइकवाडी यांचा सन्मान केला.

यापूर्वी नाइकवाडी यांनी पोलीस दलात उत्क्रष्ट कार्य केले आहे. उस्मानाबाद येथील समिर गांधी यांच्या घरावर दरोडा पडला होता त्या दरोड्यातील आरोपीच्या कर्नाटक राज्यातील दुधनी येथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यांची बहाद्दर कामगीरी आहे त्यांनी यापूर्वी स्थानीक गुन्हे अण्वेषण विभागातही चांगली कामगीरी केली आहे.

तसेच तामलवाडी , तुळजापूर ,कळंब या पोलीस ठाण्यातही कर्तव्य पार पाडले आहे.सध्या त्यांना पोलीस दलात पदोन्नती मिळाली आहे त्याबद्ल आज त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड उपस्थीत होत्या तसेच ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थीत होते .नाइकवाडी यांची येरमाळा येथील पोलीस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत डँशिंग अधिकारी म्हणून सध्या त्यांची परिसरात ओळख आहे. त्यामुळे अवैद्द धंदेवाल्यांनी त्यांचा धसकाच घेतला असल्याचीही चर्चा सुरु आहे.

Related posts